रत्नागिरी : येथील रहिवासी ॲड. राजेश श्रीपाद काळे यांची भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळे करार, शपथपत्र, कुलमुखत्यारपत्र इत्यादी दस्तऐवज साक्षांकित करण्याची सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध झाली आहे.
ॲड. राजेश काळे यांनी रत्नागिरीत विधी-व्यवसायाला २३ वर्षांपूर्वी सुरुवात केली. ते सध्या रत्नागिरी जिल्हा न्यायालय तसेच देवरूख व अन्य तालुका न्यायालये, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, विविध महसुली न्यायाधिकरणे येथे वकिली करत आहेत. राज्य आयोग, मुंबई तसेच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगचेही काम त्यांनी पाहिले आहे. राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांच्या पॅनेलवरही ते कार्यरत आहेत.
विधी-व्यवसायामध्ये असतानाच त्यांनी कायद्यामधील पदव्युत्तर शिक्षण (एलएल. एम.) पूर्ण केले आहे. तसेच, वैकल्पिक वाद निवारण (ए.डी.आर.) मधील कोर्स, सायबर कायद्यामधील शिक्षणही त्यांनी घेतले आहे. वकिली व्यवसायापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचे शिक्षण, म्हणजेच ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केला आहे.
भारत सरकारकडून ‘नोटरी पब्लिक’ म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. राजेश काळे यांचे त्यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांकडून तसेच समाजातील विविध घटकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 20-01-2025














