राजापूर : श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात मराठी भाषा व वाङ्मय मंडळाने ‘मराठी भाषा पंधरवड्या निमित्त’ आयोजित केलेल्या शेकोटी काव्य संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या थंडी विषयावरील कविता सादर केल्या. आरसीन गडकरी, सायरा काझी, प्राची पडवळ, ऋतुजा पांचाळ, सायली गुरव, सिद्धेश गोसावी, निसर्गा धावडे, दीक्षा गांगण, अमेय सावंत, प्राजक्ता बेर्डे, साहिल नॉर्वेकर, स्वाती सुर्वे, कलिका जाधव, सज्ञानी घागरे या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 20/Jan/2025














