रत्नागिरी : रेल्वेच्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ४० हजारांचा मोबाईल चोरट्याने पळवला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी दीडच्या सुमारास केरला संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शौकत अब्दुल्ला अली दिल्ली येथून कोझिकोड येथे जाण्यासाठी केरला संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. रत्नागिरी रेल्वेस्टेशनला आल्यावर त्यांनी ४० हजारांचा मोबाईल ट्रेनमध्ये चार्जिंगला लावला. ट्रेन सुरू झाल्यावर चोरट्याने तो काढून चालत्या ट्रेनमधून उडी मारून निघून गेला. या प्रकरणी शौकत अली यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 21/Jan/2025














