रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केली शिरगावच्या कांदळवनात स्वच्छता

रत्नागिरी : कांदळवन प्रतिष्ठान मुंबई आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिरगाव येथे कांदळवन स्वच्छता अभियान राबवले. कांदळवन विभाग (अलिबाग) दक्षिण कोकणचे वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. एनएसएसचे २५ विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षक, कांदळवन प्रतिष्ठान व युएनडीपी युएनडीपी जीसीएफ यांचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कांदळवन वनक्षेत्रपाल किरण ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन जैवविविधता आणि कांदळवनास असणारे मानवनिर्मित धोके याबाबतची माहिती दिली, कांदळवनसारख्या नैसर्गिक परिसंस्थेच्या रक्षण व संवर्धनासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यालयाच्या राष्ट्राय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता कार्यक्रमात घेतलेल्या सहभागाबाबत वनक्षेत्रपाल किरण ठाकुर यांनी समाधान व्यक्त केले. उपक्रमातील सहभागासाठी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहित यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला डॉ. आशिष मोहिते, प्रा. तौसिफ काझी, डॉ. राकेश जाधव, नीलेश मिरजकर व रोहित बुरटे, सुशील कांबळे यानी सक्रिय घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 22/Jan/2025