रत्नागिरी : ‘त्या’ बांगला देशी महिलेच्या पतीची जामिनावर मुक्तता

रत्नागिरी : बांगला देशी नागरिक आहे हे माहित असूनही बांग्लादेशी महिले सोबत लग्न करुन भारतात वास्तव्य करण्यासाठी तिला सहाय्य करणाऱ्या पतीची न्यायालाने ५० हजारांच्या जामिनावर सशर्त मुक्तता केली. तर त्याची पत्नी न्यायालयीन कोठडीतच आहे. राहिल मुराद भोंबल (रा.साळवीस्टॉप, रत्नागिरी) असे जामिनावर मुक्तता करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सलमा राहिल भोंबल (३०) ही बांग्लादेशी नागरिक असूनही त्याने तिला भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला अशी कागदपत्रे तयार करून बँकेत खाते उघडून दिले. तसेच पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वैध कागदपत्रांशिवाय भारतात अवैधरित्या वास्तव्य करताना मिळून आली होती. या दोघांनाही न्यायालाने प्रथम पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने राहिलची ५० हजारांच्या जामिनावर दर रविवारी शहर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या शर्थीवर मुक्तता केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 24/Jan/2025

Happy journey english