रत्नागिरी : मालगुंड ग्रामंचायतीत महसूल कार्यक्रमअंतर्गत विविध योजनांची माहिती

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील ग्रामंचायत कार्यालयात मालगुंड ग्राम महसूल कार्यालयामार्फत महसूल संवाद कार्यक्रम गुरुवारी २३ जानेवारी रोजी घेण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन मालगुंड येथील ग्राम महसूल कार्यालयाचे वतीने करण्यात आले होते.

क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर दिनांक ७ जानेवारी, २०२५ रोजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय घ कार्यालयामध्ये सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता ७ कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. सदर सात कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रशासनास येत्या १०० दिवसात त्यांनी आपल्या आयुष्यात नामवंत प्राधान्याने करावयाच्या कार्यवाही अंतर्गत गुरुवारी २३ जानेवारी रोजी मालगुंड ग्रामपंचायत इथे सं. गां नायब तहसीलदार अनंत चव्हाण, महसूल नायब तहसिलदार गोरे मॅडम, मंडळ अधिकारी मालगुंड अरुण जाधव, ग्राम महसूल अधिकारी मालगुंड सौरभ जाधव यांच्या मार्फत महसूल संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या अनुषंगाने महसूल अंतर्गत विविध योजनांची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचा लाभ मालगुंड गावातील स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घेतला. या कार्यक्रमाला मालगुंड ग्रामपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालगुंड येथील ग्राम महसूल कार्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मंडळ अधिकारी अरुण जाधव आणि ग्राम महसूल अधिकारी सौरभ जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:59 PM 24/Jan/2025

ronic