रत्नागिरी : भारतीय संसदेने पारित केलेल्या भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन तीन कायद्यांचा प्रसार व प्रसिद्धीसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी १०० दिवसांत प्रत्येक पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये १६ जानेवारीपासून विविध कार्यशाळा (workshop) आयोजित केल्या आहेत.

भारतीय संसदेने भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे तीन नवीन कायदे पारित केले असून त्यांची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. याच अनुषंगाने अपर मुख्य सचिव (गृह), यांच्या ८ जानेवारी २०२५ च्या अ.शा. पत्रानुसार, भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ह्या नवीन तीन कायद्यांचा प्रसार व प्रसिद्धीसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी १०० दिवसांत प्रत्येक पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये दिनांक १६/०१/२०२५ पासून विविध कार्य शाळा (workshop) आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या कार्यशाळांचे प्रामुख्याने ग्राम पंचायत स्तरावर ३० टक्के, तालुका स्तरावर ६० टक्के आणि जिल्हा स्तरावर १० टक्के या स्वरूपात विभाजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, नामांकित कायदेतज्ज्ञ, सरकारी वकील आणि या विषयातील अभ्यासक यांना निमंत्रित करण्यात येणार असून, कार्यशाळेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विधी तज्ञ, विशेष सामाजिक घटक आणि नागरिकांचा समावेश असणार आहे.
या कार्यशाळांचे पोलीसांमार्फत व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील केले जाणार आहे. याच अनुषंगाने २६ जानेवारीअखेर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २१ कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 28/Jan/2025













