राजापूर : सर्वसामान्यांची गाडी म्हणून नावलौकिक असलेल्या एसटीची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काल चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या वेळी एसटी प्रशासनाला निवेदन देऊन एसटी भाडेवाडीकडे लक्ष वेधण्यात आले. राजापूर वगळता अन्य तालुक्यात ठाकरे सेनेकडून आंदोलन झालेले नाही.
राजापूर येथे झालेल्या आंदोलनावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, संजय पवार, रामचंद्र सरवणकर, संतोष हातणकर, नरेश दुधवडकर, शहर संघटक वीणा विचारे, उमेश कोळवणकर, श्रद्धा धालवलकर, मंदा शिवलकर, प्रकाश गुरव, माजी नगरसेवक विनय गुरव, गोविंद चव्हाण, अनिल कुडाळी, विजय गुरव, प्रतीक्षा मांजरेकर, स्नेहा उगले, मीनाक्षी गुरव, मानसी नांदगावकर, संजय शिंदे, रमेश गोडांबे, सुभाष पावणाक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 29/Jan/2025












