घरफोडीत चोरीला गेलेले १२ तोळे सोने चिपळूण पोलिसांनी महिलेला केले सुपूर्द

चिपळूण : पोलीस स्थानिक हद्दीतील कापसाळ येथील एका महिलेच्या घरात २०२४ साली चोरी झाली होती. या प्रकरणी महिलेने चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत आरोपीला गजाआड केले होते. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल १२ तोळे सोने जप्त करण्यात आले होते.

हा मुद्देमाल न्यायालयात हजर करण्यात आला. शासनाच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत चिपळूण पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी रेवती रामदास शिर्के (रा. कापसाळ) यांचे चोरीस गेलेले १२ तोळे सोन्याचे दागिने न्यायालयाचे आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या हस्ते महिलेला सुपूर्द करण्यात आले. हा ऐवज फिर्यादी यास सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 29/Jan/2025