महाराष्ट्र नेव्हलचे रत्नागिरी एनसीसी युनिट देशात प्रथम

रत्नागिरी : एनसीसी ऑल इंडिया मेनू २०२५ कॅम्प स्पर्धेमध्ये देशात २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीने प्रथम क्रमांक मिळविले. एनसीसी नेव्हल विंग अंतर्गत २०२५ मेनू स्पर्धेमध्ये रत्नागिरीचे २ महाराष्ट्र नेव्हल युनिट रत्नागिरी या कार्यालयाने देशामध्ये पहिला क्रमांक पटकावून उज्ज्वल यश मिळवले आहे.

या कॅम्पमध्ये एकूण ६० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलामुलींचा सहभाग होता. शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेले पात्र कॅडेट सहभागी झाले होते. शिबिर ५ ते १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत रत्नागिरी ते वरवडे, जयगड, तवसाळ, बोरीया मार्गे असून त्याचमार्गे परत रत्नागिरी असे यशस्वी झाले. शिबिराचे प्रमुख प्रशिक्षण मार्गदर्शन कमांडर राजेशकुमार, समादेशक अधिकरी २ महानेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीच्या मार्गदशनाखाली चार वर्षांत सलग तीन वेळा प्रथम कमांकाचा मान पटकावला आणि एकवेळा दुसरा क्रमांकाचा मान पटकावला आहे. न्यू दिल्ली येथे झालेल्या पीएम रॅलीवेळी महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीला देशात प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 31/Jan/2025