रत्नागिरी : पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर नाटेकर बालक मंदिरात आनंद बाजार

रत्नागिरी : कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर नाटेकर बालक मंदिरात ‘आनंद बाजार’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात बालवाडी विभागातील मोठा गट मोगरा व चमेली या दोन वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले.

या कार्यक्रमावेळी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाहक सतीश शेवडे, समितीचे अध्यक्ष पाटणकर, मुख्याध्यापिका राजवाडे, बालवाडी विभाग प्रमुख महाडिक उपस्थित होते. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी खाऊ, भाज्या, कॉस्मेटिक इ. स्टॉल लावले होते. खरेदीसाठी छोटा गट व नर्सरी या वर्गातील विद्यार्थी व त्यांच्यासोबत पालकही उपस्थित होते.

सर्वांनी खरेदीचा आनंद घेतला. मुलांचाही उत्साह ओसांडून वाहत होता. या कार्यक्रमाचे नियोजन बालवाडी शिक्षिका लाड, चव्हाण, मुळ्ये, गुळेकर तसेच सर्व सेविका व वर्गाचे प्रतिनिधी यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 31/Jan/2025

Sahyog multi.