देवरुख आगाराला मिळणार नवीन एसटी बसेस

देवरुख : राज्य परिवहन मंडळाच्या देवरुख आगाराची एसटी बस सेवा सध्या कोलमडलेली आहे. याला एकमेव कारण म्हणजे या आगारात असणाऱ्या बसेसची अपुरी संख्या. एसटी बस मिळाव्यात, यासाठी येथील नागरिक सतत मागणी करत असतात. याचीच दखल घेत चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. मंत्री महोदय यांनीही मागणीला हिरवा कंदिल दिला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

देवरुखमधील प्रवाशांकडून होत असलेल्या एसटी बसची मागणी लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चिपळूण व देवरूख या दोन्ही आगारांना नवीन एसटी बसेस देण्याची निवेदनाद्वारे आग्रही मागणी केली आहे. परिवहन मंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंत्री सरनाईक यांनी सदर मागणीवर माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे देवरूख आगाराला नवीन एसटी बस मिळणार असल्याने नागरिक तसेच प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 01/Feb/2025