रत्नागिरी : कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीची एसटी बसला धडक

रत्नागिरी : पुढील कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या एसटीला धडक देत दुचाकीस्वाराने अपघात केला.

अपघाताची ही घटना शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी १०.२० वा. सुमारास जाकादेवी ते राई जाणाऱ्या रस्त्यावर घडली. गणशे प्रकाश सावंत (४१, रा. राई, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, शुक्रवारी सकाळी गणेश हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०४-एमडी-७१२२) घेउन बेदरकारपणे जाकादेवी ते राई रस्त्याने जात होता. तो विल्ये गावातील डावखोल फाट्याचे अलीकडे आला असता पुढील कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने समोरुन येणाऱ्या एसटी (एमएच-२०-बीएल-१६६०) धडक देत अपघात केला. यात त्याला लहान मोठ्या दुखापती झाल्या आहेत. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 04/Feb/2025