रत्नागिरी : तालुक्यातील कसोप सडा येथील महिलेचा प्रेशर व थायरॉईड आजाराने आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७. २५ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. नंदा संजय वाडकर (४६, रा. कसोप सडा, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना गेले काही दिवस प्रेशर आणि थायराईडचा त्रास होत होता. रविवार २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या छातीत कळ येउन त्या बेशुध्द पडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी खासगी दवाखान्यात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 04/Feb/2025














