रत्नागिरी : गणेशोत्सव मंडळातर्फे विद्यार्थिनींना सायकल

रत्नागिरी : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील महागणपतीला माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि नीलमताई राणे यांनी सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी मंडळाच्यावतीने खासदार राणे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी खासदार राणे यांच्या हस्ते रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दोन होतकरू शाळकरी विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आली.

त्यात लांब उडी, धावणे, लंगडी यामध्ये जिल्हास्तरावर यश मिळवलेल्या जिल्हा परिषद शाळा उक्षी नं. १ प्रशालेची सलोनी गराटे आणि कुस्ती या खेळात ३३ किलो वजनी गटात राज्यस्तरापर्यंत धडक मारणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी जाकिमिऱ्या अलावा येथील रूद्रा चव्हाण या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

या वेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उद्योजक अमित देसाई, मंडळाच्या उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 04-02-2025

Tata SUV