रत्नागिरी : देवरूख-पठारवाडी (ता. संगमेश्वर) येथे पोलिसांनी दारू अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरूख पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष सावजी पर्शराम (५२, रा. देवरूख पर्शरामवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) सकाळी पावणेअकराच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवरूख पठारवाडी बांबरचा पऱ्या येथे विनापरवाना हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये ३८ हजाराचे ७५० लिटर गूळ व नवसागरमिश्रित उकळते रसायन बॅरलसहित, ५० रुपयांचा चाटू, ५०० रुपयांची अॅल्युमिनियम डेग, २ हजार १०० रुपयांची २० लिटर गावठी दारू असा सुमारे ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 04-02-2025














