सावर्डे : वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे दि. ८, ९, १० फेब्रुवारी रोजी मूत्राशयाच्या आजारात बाबत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी मुंबईचे युरो सर्जन डॉ. सतेज सबनीस उपलब्ध राहणार आहेत.
शिबिरात मूतखडे, प्रोस्टेस्ट ग्रंथी, मूत्रमार्गाचे आजारावर दुर्बिणीद्वारे उपचार करण्यात येतील. मुतखडा रुग्णांचे प्रमाण कोकण विभागात भरपूर आहे. मुतखडे हे किडनीमध्ये, मूत्र मार्गात किंवा मुत्राशयाच्या पिशवीत होतात. रुग्णाला अचानक पोटात दुखणे, उलट्या होणे, लघवीतून रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे मुतखडा झालेल्या रुग्णांत दिसतात. शिबिरात मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथी या आजारास महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. ग्रामीण भागातील रुग्णांनी शिबिरात सहभागी होऊन लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 04/Feb/2025














