राजापूर : सौंदळ स्थानकाची खा. नारायण राणे करणार पाहणी

राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे कायमस्वरूपी थांब्यात रेल्वे स्थानकात रूपांतर व्हावे, या स्थानकावर अन्य सेवा सुविधांची निर्मती करून अन्य एक्स्प्रेस गाड्याही या स्थानकात थांबाव्यात या मागणीसाठी सौंदळ पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांसह प्रवाशांनी केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यांना यश येणार आहे. याप्रश्नी खासदार नारायण राणे यांनी दखल घेतली असून, लवकरच सौदळ स्थानक परिसरात भेट देऊन खासदार श्री. राणे हे या भागातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

याप्रश्नी भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी राणे यांची काल भेट घेऊन या विषयावर चर्चा केली असता राणे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याची माहिती रवींद्र नागरेकर यांनी दिली आहे. तालुक्यात सौदळ येथील हॉल्ट स्थानक आहे. मात्र, या हॉल्ट स्थानकाचे स्थानकात रूपांतर व्हावे अशी स्थानिक जनतेची मागणी आहे, तर अन्य सेवा सुविधांची निर्मती करावी व या स्थानकात अन्य एक्प्रेसस गाड्यांनाही थांबा मिळावा, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे. यासाठी या भागातील सरपंच, ग्रामस्थ व प्रवाशी संघटना यांनी भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. नागरेकर यांची भेट घेऊन याबाबत नारायण खासदार राणे यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 04/Feb/2025