चिपळूण : गावची ग्रामपंचायत ही विकासाची पायाभूत सेवा सुविधा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ही नूतन वास्तू नवी ओळख ठरेल. आरवली गावच्या सर्वांगीण विकासासाठी सेवा सुविधा पुरविणे ही माझी जबाबदारी असल्याचे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.
आरवली गावाच्या निर्मल ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार निकम यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निकम म्हणाले, ग्रामपंचायतीच्या या नूतन इमारतीमुळे गावच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविता येतील. गावाच्या प्रगतीचा विचार करता, पुढील काळात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत बाबींवर अधिक भर दिला जाईल. गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. यावेळी दिलीप सावंत, विनोदकुमार शिंदे, सरपंच नीलेश भुवड, पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी, सुशील भायजे, शेखर उकार्डे, बंडू पाटणकर, जाकीर शेखासन, सुभाष गुरव, कृष्णा भोसले आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 04/Feb/2025














