संगमेश्वर : धान्याचा लाभ दोन दिवसांत मिळणार

संगमेश्वर : तालुक्यात ऑक्टोबर २०२४ पासून बंद असलेला धान्याचा लाभ दोन दिवसांत लाभार्थ्यांना पुन्हा दिला जाणार आहे. त्यासाठी आमदार शेखर निकम यांनी उपसचिव संतोष गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

आरसीएमएस प्रणालीवर ऑक्टोबर २०२४ पासून शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव चढवणे, शिधापत्रिकेवरील योजनेचा लाभ करणे आदी कामे पॉस मशीनवर अपडेट झाली नव्हती. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्याचा लाभ घेता येत नव्हता. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही कामे पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्षात ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधी गेल्यामुळे लाभार्थी तक्रार करत होते. या संदर्भात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग उपसचिव यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माहिती दिली. पॉस मशिनवर डाटा अपडेट करून लाभार्थ्यांना शिधा वितरण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यासाठी आमदार शेखर निकम यांनी उपसचिव संतोष गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 05/Feb/2025