चुलीवर पडून महिला भाजली

रत्नागिरी : गुहागर येथे चुलीवर चक्कर येऊन पडून भाजलेल्या महिलेला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास घडली. सानिका समीर पोसकर (३८, रा. असोले ता गुहागर, रत्नागिरी) असे भाजून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सानिका पोसकर यांना चक्कर येण्याची सवय होती. शनिवारी सकाळी त्या आपल्या घरी चुलीवर जेवण बनवत असताना त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्या चुलीवर पडल्याने त्यांचा चेहरा भाजला. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे दाखल करुन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 05/Feb/2025