गणेशगुळे समुद्र किनाऱ्यावर कासवांची चार घरटी संरक्षित

पावस : तालुक्यातील गणेशगुळे समुद्र किनाऱ्यावर कासवांची अंडी सापडली आहेत. येथील कासव मित्रांनी चार घरटी किनाऱ्यावर संरक्षित केली आहेत.

गेल्यावर्षी या किनाऱ्यावर प्रथमच अंडी सापडली होती. प्राणिमित्र व वनविभागाने घरट्यांचे संरक्षण करून पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडली होती. यावर्षी कासवांच्या विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. यावर्षी गावखडी किनाऱ्यावर तीन घरटी संरक्षित करण्यात आली. मात्र, गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर उशिरा अंडी सापडली. कासव मित्र सचिन तोडणकर यांनी चार घरटी किनाऱ्यावर चार दिवसांपूर्वी संरक्षित केली आहेत. या संदर्भात सचिन तोडणकर म्हणाले, चार घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. आणखी काही घरटी तयार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्याकडे विशेष लक्ष ठेवून आहोत. पिल्ले तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने समुद्रामध्ये सोडण्याचा मानस आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 05/Feb/2025