Rajapur : आडिवरे महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

राजापूर : शारदीय नवत्रोत्सवात जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या तालुक्यातील Rajapur आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला येत्या गुरुवारपासून (ता. ३) घटस्थापनेपासून प्रारंभ होणार आहे. उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे.

आडिवरेतील श्री महाकालीची सर्वदूर ख्याती असून, या ठिकाणी नवरात्रोत्सवाला येत्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. या उत्सवकाळात देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथूनही भाविकांची गर्दी होते. उत्सवकाळात दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पूजापाठ, अभिषेक व महानैवद्य, दुपारी ३ वा. घटाची आरती, सायं. ४ ते ५ पर्यंत राजापूर येथील विद्याधर करंबेळकर यांचे कीर्तन, ६.३० वा. धुपारती, रात्री ७ ते ८ या वेळेत रत्नागिरी ओंकार मुळ्ये यांचे प्रवचन, ८ ते ९ या वेळेत सांगली येथील अभिषेक काळे यांचे गायन, ९ ते १०.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा होईल. दररोज सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत देवीचे दर्शन बंद राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 02/Oct/2024

Arihant 1