रत्नागिरी : भारतमातेच्या प्रतिमेची तीन पिढ्या देवघरात पूजन विलणकर यांच्या घरात केले जाते. संजीवनी यांनी भारतमातेच्या पूजेच्या अनोखा उपक्रमासह प्रत्येक देशाच्या मातीचे संकलन केले आहे.
सद्यःस्थितीत त्यांच्याकडे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील १०० गावांतील मातीचे तसेच २६ देशांच्या मातीचे संकलन झाले आहे. मनामनांत हिंदूस्थान, घराघरात हिंदूस्थान या घोषवाक्यातून भारतमातेचे घराघरांत पूजन व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
संजीवनी या मूळच्या शहरातील खडपेवठार येथील त्यांचे वडील राजाराम विलणकर यांनी १९४२ पासून ते १९९६ पर्यंत घरात देशभक्तीची खऱ्या अथनि सुरुवात केली. देशसेवेचे हे बाळकडू त्यांना तेथूनच मिळाले. पुढे त्या कन्याकुमारी येथे गेल्यानंतर तेथील माती हातात घेतल्यावर मनात एक वेगळा तरंग उठला आणि माती संकलन करण्याचे मनात आले. संजीवनी या त्यांच्या देवघरात भारताचा नकाशा व तिरंगा ध्वजाची पूजा दीर्घकाळ करत आहेत. भारताचा नकाशा व तिरंगा ध्वजाच्या पूजेसह प्रत्येक देशातील मातीचे संकलन केले तर तीही एक देशसेवा होईल, असे मनात आले आणि तिथूनच पुढे त्यांना प्रत्येक देश, जिल्हा, तालुका आणि गावातील मातीचे संकलन करत असून, सद्यःस्थितीत त्यांच्याकडे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांसह १०० गावांतील मातीचे तसेच २६ देशांच्या मातीचे संकलन त्यांनी केले आहे.
गेली ८३ वर्षे भारतमातेची पूजा करण्याचा संकल्प त्यांच्या घरात सुरू आहे. २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि १५ ऑगस्ट या दिवशी त्या त्यांच्या विवापॅलेस येथील घरी भारताचा नकाशा, तिरंग्याची पूजा करतात. घरी भेट देणाऱ्या प्रत्येकाला ये भारतमातेची प्रतिमा भेट देतात.
संजीवनी विलणकर यांनी सांगितले, महावितरणच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर विलणकर यांना महावितरण कंपनीकडून चांदीचे नाणे देण्यात आले. त्या नाण्यापासून त्यांनी देशाचा नकाशा आणि तिरंगा एकत्रित प्रतिमा तयार करून घेतली. २०१२ पासून त्या देवघरात नित्यनेमाने पूजन करतात.
देशातील दुर्गम भागातील मातीचे संकलन
मातीतून माणसाच्या स्वभावाचा निष्कर्ष जुन्या जमान्यात लावला जातो. प्रत्येक ठिकाणच्या मातीचा रंग वेगळा आहे. राजस्थानला किसनपुरा येथे पांढरी माती मिळते. घराघरांत पूजन प्रत्येकाने केल्यास प्रत्येकजण देशसेवेला जोडला जाईल तसेच देशाच्या दुर्गम गावातील मातीचे संकलन तसेच यासाठी इमारत उभी करण्याचा मानस असल्याचे संजीवनी विलणकर यांनी सांगितले.
पेन्शनमधून तिरंगा, हिंदूस्थानच्या प्रतिमांची भेट
आजही विलणकर यांना दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमधून लहान-मोठ्या आकाराच्या तिरंगा आणि हिंदुस्थानच्या नकाशाच्या प्रतिमा तयार करून शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, अधिकारी, संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना भेट देत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 05/Feb/2025














