रत्नागिरी एमआयडीसी ब्रिजवर रेल्वेखाली आत्महत्या; ट्रॅकमनचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एमआयडीसी येथील कोकण रेल्वेच्या ब्रिजवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. काल रात्री 12:30 वाजता, मत्स्यगंधा एक्सप्रेस गाडी खाली ट्रॅकमन असलेल्या संदीप तानाजी लोंढे यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. ही घटना रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागात घडली असून, ग्रामीण पोलीस अधिकारी या प्रकरणाची पुढील तपासणी करत आहेत.

संदीप तानाजी लोंढे हे 38 वर्षांचे होते आणि त्यांच्या आत्महत्येच्या कारणांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही घटना रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी धक्कादायक आहे आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 05-02-2025