रत्नागिरी : सहकारनगर व पॉवरहाऊस येथे प्रवासी मार्ग निवाऱ्याचे लोकार्पण

रत्नागिरी : भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वनिधीतून उभारलेल्या नाचणे रोडवरील सहकारनगर व पॉवरहाऊस प्रवासी मार्ग निवाऱ्याचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. सहकारनगर व पॉवर हाऊस येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उपस्थित होते. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला. यावेळी शिल्पा मराठे, विक्रम जैन, दादा दळी, विवेक सुर्वे, राजन फाळके, संकेत कदम, मनोर दळी, भक्ती दळी, नीलेश आखाडे, उमेश देसाई, नुपुरा मुळ्ये आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 06/Feb/2025

Shanti real estate 1