दापोली : जुगार चालवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

दापोली : दापोलीमध्ये एका अपार्टमेंटच्या मागील बाजूस जुगार खेळ चालवणाऱ्या तिघांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.२५ वा. सुमारास करण्यात आली. दिलावर इस्माईल भोंबल (वय ४८, रा. काळकाईकोंड भारतनगर दापोली), चिंतामणी आत्माराम सकपाळ (६७), अंकूश रघुनाथ आयरे (४५, दोन्ही रा. दापोली बौध्दवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस नाईक राजेंद्र नलावडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, हे तिन्ही संशयित हे दापोली येथील फरहान अपार्टमेंटच्या मागील बाजूस झाडीझुडपाच्या आडोशाला मटका जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर साहित्य असा ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 06/Feb/2025