गावडे आंबेरे-जुवळेवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या महिलेवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील गावडे आंबेरे-जुवळेवाडी येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या महिलेविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास करण्यात आली. अरुणा अनंत गोळटकर (५८, रा. जवुळेवाडी गावडे आंबेरे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल महेश कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिला विना परवाना १ हजार रुपये किंमतीची १० लिटर गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. तिच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनिमय १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 06/Feb/2025