गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ मालगुंड तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ मौजे मालगुंड आणि आदर्श महिला मंडळ मालगुंड यांचे संयुक्त विद्यमाने माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा १२७ वा जयंती दिनाचा कार्यक्रम धम्मचेतना बुद्धविहारात साजरा करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आदर्श महिला मंडळाच्या उपाध्यक्ष शर्मिला राहुल पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी स्थानिक शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार व त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद बंधूभगिनी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्मचेतना बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या मूर्तीसमोर दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. त्यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धार्मिक पूजापाठ घेण्यात येणार आहे. त्यानंतर माता रमाई आंबेडकर यांचे जीवन कार्यावर आधारित अभिवादन सभा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला मंडळाच्या सदस्या, शालेय विद्यार्थी व मान्यवरांची भाषणे होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाला वाडीतील भगिनींनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे, असे आवाहन मालगुंड शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार व महिला मंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 06-02-2025












