रत्नागिरी : पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत योजनेसाठी १० फेब्रुवारी पर्यंत मुदत

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींकरिता पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत योजना आखण्यात आली असून त्याकरिता अर्ज करण्याची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाइल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 06-02-2025

Happy journey marathi