जंगम व लिंगायत समाजाच्या वतीने चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चिपळूण : चिपळूण रामतीर्थ ते शंकरवाडी हा नऊ मीटर रुंदीचा रस्ता होत आहे. रामतीर्थ येथील जंगम व लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची जागा मोजून संपूर्ण स्मशानभूमी सभोवार रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत), अंतयात्रेला आलेल्या समाज बांधवांना उभे रहाण्यासाठी शेड बांधकाम नगरपालिकेमार्फत मार्च महिनाअखेर पूर्ण करावे, असे निवेदन माहेश्वर व लिंगायत समाजाच्यावतीने नगर परिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांना देण्यात आले.

यावेळी माहेश्वर समाजाचे माजी अध्यक्ष विवेक जंगम, लिंगायत समाजाचे अध्यक्ष आप्पा वरवडेकर, पत्रकार संतोष पिलके, वरवडेकर, आण्णा लिगायत, बापू आवटे, साखरपेकर उपस्थित होते. यावर मुख्याधिकारी यांनी मार्च महिनाअखेर स्मशानभूमी येथील रिटेनिंग वॉल शेडच्या बांधकाम व सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 06/Feb/2025

Tata tiago