गोगटे जोगळेकर महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळा

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीने दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी शिक्षकांसाठी प्रभावी मूल्यमापन आणि मूल्यांकन या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा पीएमउषा योजनेंतर्गत, एमएसएफडीए आणि आयआयएसईआर पुणे यांच्या सहकार्यान आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी-२०२०) सुसंगत अशी ही कार्यशाळा पारंपरिक मूल्यांकन पद्धतींपासून दूर जाऊन प्रगतिशील आणि अंतिम मूल्यांकन पद्धतींकडे लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. डॉ. निरजा दशपुत्रे, (प्रमुख तांत्रिक आणि शैक्षणिक अधिकारी) या कार्यशाळेच्या प्रमुख सल्लागार म्हणून उपस्थित होत्या.

महाविद्यालयाच्या पीएम उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, आयोजन समितीचे प्रमुख डॉ. विवेक भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा देत, कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा त्यांच्याच अध्यापन पद्धतींमध्ये उपयोग करण्याचे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 06-02-2025