खेड : अवघ्या एका तासात २२ अल्पवयीन दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका

खेड : बेदकारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांसह अल्पवयीन दुचाकीस्वारांविरोधात येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. सोमवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत भर बाजारपेठेत राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान एका तासात २२ अल्पवयीन दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला. त्यांच्याकडून ३९ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला.

शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनल्याने बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहीम सुरुच आहे. या पाठोपाठच विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्यांसह अल्पवयीन दुचाकीस्वारांवरही धडक कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. भर बाजारपेठेत केलेल्या कारवाईत २२ अल्पवयीन दुचाकीस्वार कचाट्यात अडकले. या दुचाकीस्वारांकडून ३९,५०० रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला. गांधीचौक येथे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस कर्मचारी नंदकुमार घाणेकर, पोलीस शिपाई संपत गीते व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 06-02-2025