खेड : लोटेमाळ येथील मारहाणप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा

खेड : तालुक्यातील लोटेमाळ येथे दि.३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत बाबुराव काते (वय ३३, व्यवसाय-ट्रान्सपोर्ट, रा. लोटेमाळ ता. खेड) यांनी या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

सूर्यकांत काते हे त्यांच्या शेतात पाईपलाईन तपासण्यासाठी गेले होते. संजय नलावडे यांच्या घरी भाड्याने राहणारे दोन कामगार पाईपलाईनवर बसले होते. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणी वाया जात होते. काते यांनी त्यांना उठण्यास सांगितल्यावर त्यांनी शिविगाळ केली व मारहाण केली. एका आरोपीने काठीने काते यांच्या छातीवर व हातापायावर मारून त्यांना जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजयकुमार रज्जुसिंग मरावी आणि सतिष देवराज मारवी यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), १११(२), १४९, ३५१ (२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 07/Feb/2025