रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कसबा लेंडी याठिकाणी एका चहाच्या टपरीवर मटका जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वा. सुमारास करण्यात आली. चंद्रकांत सखाराम सावंत (६२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉस्टेबल राहुल खरपे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा तेथील चहाच्या टपरीवर लोकांकडून रोख रक्कम स्विकारुन बिगर परवाना मटका जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 07/Feb/2025














