रत्नागिरी : येथील श्रीमंत पेशवाई गणपती चषक बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे विजेता, तर साईप्रसाद साळवी उपविजेता ठरला.
येथील मारुती आळीतील श्री हनुमान मित्रमंडळातर्फे रत्नागिरीतील राधाकृष्ण मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त श्रीमंत पेशवाई गणपती चषक जिल्हा अजिंक्यपद जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळातर्फे सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. मंडळाचे आधारस्तंभ प्रमोद शेरे यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
रत्नागिरीच्या यश गोगटे याने ७ फेऱ्यांमध्ये अपराजित राहत ६.५ गुणांसह या स्पर्धेचे निर्विवाद विजेतेपद प्राप्त केले तर साईप्रसाद साळवीने उपविजेतेपद पटकावले. अत्यन्त अटीतटीच्या अंतिम फेरीतील सामन्यात यशने रत्नागिरीच्या अनिकेत रेडीज विरुद्ध विजय संपादन केला, तर साईप्रसादने प्रसाद तेंडुलकर विरुद्धचा सामना जिंकला. स्पर्धेतील प्रथम मानांकित अवधूत पटवर्धन याने ओंकार सावर्डेकरचा पराभव करून तृतीय स्थानाला गवसणी घातली. चिपळूणच्या सहाव्या मानांकित प्रवीण सावर्डेकरने साहस नारकरविरुद्धचा सामना जिंकत चौथा क्रमांक पटकावला. साईप्रसाद, अवधूत व प्रवीण तिघांचे समान ६ गुण झाले, पण सरस टाय ब्रेकवर साईप्रसादने बाजी मारली.
स्पर्धेचा इतर निकाल असा – खुला गट क्रमांक पाच ते दहा : अनिकेत रेडीज, अनंत गोखले, कौस्तुभ हर्डीकर, श्रीहास नारकर, साहस नारकर, आयुष रायकर.
विविध वयोगटातील उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त खेळाडू : १५ वर्षांखालील मुले : आर्यन धुळप, अर्णव चव्हाण.
१५ वर्षांखालील मुली : सई प्रभुदेसाई, पद्मश्री वैद्य.
१३ वर्षांखालील मुले : अर्णव सासवडे, ओम तेरसे.
१३ वर्षांखालील मुली : आर्या पळसुलेदेसाई, तनया आंब्रे
११ वर्षांखालील मुले : अद्वैत शानभाग, वर्धन बेहरे
११ वर्षांखालील मुली : तिथी कुलकर्णी
९ वर्षांखालील मुले : आरव निमकर, विहंग सावंत
एकूण १७ फिडे मानांकित खेळाडूंसह संपूर्ण जिल्ह्यातून १०० बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे बक्षीस वितरण सुनील गांधी, मिलिंद दळी , राजू खेडेकर, समीर लांजेकर, सचिन बंदरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे चैतन्य भिडे व वरद पेठे यांनी स्पर्धेच्या तांत्रिक नियोजनाची व पंच कामगिरीची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 07-02-2025












