रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. सुमारास करण्यात आली. हेमंत हनुमंत देवकर (२८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल भालचंद्र दिलीप मयेकर (३८) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शहरातील हिंदु कॉलनी येथील एका बियर शॉपीच्या बाजुला आडोशाला संशयित हा बियर पित असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 07/Feb/2025














