चिपळूणमध्ये विनापरवाना बांधकामप्रकरणी दोघांवर गुन्हा

चिपळूण : चिपळूण शहरातील जंगम आळी-बापट आळी तसेच भोगाळे येथे विनापरवाना बांधकाम करणाऱ्या दोघांवर चिपळूण पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश अमृतसिंग जंगम, आदित्य भरत भोसले (दोघे चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार संदेश सीताराम टोपरे (४८, चिपळूण नगरपालिका कर्मचारी) यांनी दिली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश जंगम यांनी चिपळूण पालिकेअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात जंगम आळी-बापट आळी येथील जागेवर विनापरवाना बांधकाम केले आहे. तसेच भोगाळे येथे आदित्य भोसले यांनी पत्र्याच्या शेडचे बांधकाम केल्याचे रचना सहायक गट व यांच्या प्राथमिक अहवालातून पुढे आले आहे. याबाबत चिपळूण पालिकेने जंगम व भोसले यांना कायदेशीर नोटीस बजावली होती; मात्र त्यांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जंगम यांच्या १९ मे २०२२ पासून तसेच भोसले यांच्या १८ जून २०२४ पासून आतापर्यंत असलेल्या या अनधिकृत बांधकामप्रकरणी संदेश टोपरे यांनी तक्रार दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 07/Feb/2025

Khabardar diwali fest