चिपळूण : मार्गताम्हानेत पोलिसांकडून नवीन कायद्यांविषयी जनजागृती

चिपळूण : रामपूर सात कलमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला नवीन कायद्याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. रामपूर पोलिस दूरक्षेत्र हद्दीतील मार्गताम्हाने येथे हा उपक्रम पोलिसांनी राबविला.

नवीन कायद्याचा उद्देश, नवीन कायदयातील बदल, कायदयाबाबत शंकेचे निरसन करणे, कायदयाविषयी जनजागृती, प्रसिध्दी व प्रसार करण्यात येत आहे. याविषयीची माहिती चिपळूण पोलिस उपनिरीक्षक अरुण जाधव यांनी दिली.

यावेळी रामपूर पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार संतोष राठोड, अजित कदम, कॉन्स्टेबल किरण केदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी नवीन कायदे आवश्यक आहेत आणि त्यांचा आदर करणे आणि त्यांचे पालन करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. नागरिकांनी देशातील कायद्यांचे पालन केले तरच शांतता आणि सुव्यवस्था सुनिश्चित करता येते. नागरिकांना नवीन कायद्यांबद्दल जागरूक करण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 07/Feb/2025