संगमेश्वर : अणदेरीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’अभियान

संगमेश्वर : महिला बालविकास सेवा योजना संगमेश्वर (देवरुख) प्रकल्पामधील अंगणवाडी केंद्र अणदेरी, बीट नायरी येथे २२ जानेवारी व ८ मार्च दरम्यान बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी अणदेरी येथे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

अभियान शपथ, प्रभात फेरी, किशोरीनां मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड वाटप, त्याची विल्हेवाट असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमामध्ये अणदेरी अंगणवाडी पालक वर्ग, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व शिक्षकवृंद श्रीम. वसावे, गावीत, राऊत तसेच अणदेरी पोलीस पाटील महेंन्द्र होडे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. सर्व कार्यक्रमाचे आयोजन गायत्री घडशी व श्रद्धा बेंद्रे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 07/Feb/2025