रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीच्या सात विद्यार्थ्यांची अॅडिसॉफ्ट कंपनीकडून निवड

रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथील २०२५ बॅचमधील ७ विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित अॅडिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, पुणे येथे नोकरीसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील कादंबरी प्रभूवालखवलकर, श्रेयस चव्हाण, सौरभ साळवी व साक्षी सावंत यांचा समावेश आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील नामिरा कखसू व साहिल कदम आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील समीर वेते यांचा समावेश आहे.

अॅडिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज ही उत्पादन कार्यक्षमता सुधारण्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि औद्योगिक ऑटोमेशनच्या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी आहे. कंपनी शॉप फ्लोअर इक्विपमेंट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लेयरचे इंटिग्रेशन करून मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेत सुधारणा करते. ओईएम क्षेत्रात यशस्वी प्रकल्प कार्यान्वयनानंतर कंपनी भारतभर आणि जागतिक स्तरावर विस्तार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

अॅडिसॉफ्ट टर्नकी सोल्यूशन्स पुरवते, ज्यामध्ये मित्सुबिशी एफ. ए. प्रॉडक्ट, आर एफ आय डी सिस्टिम्स, सेन्सर्स, पोका योके युनिट्स, स्काडा पॅकेजेस, फिल्ड इंस्टॉलेशन आणि कमिशनिंग सेवा, तसेच ट्रेनिंग आणि एएमसी सेवा यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना अशा नावाजलेल्या कंपनीत संधी मिळणे ही महाविद्यालयासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

फिनोलेक्स अकॅडमीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीमने विद्यार्थ्यांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अॅप्टीट्यूड टेस्ट, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि टेक्निकल सेशन्स यासारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योग जगतात प्रवेशासाठी तयार केले जाते. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि संपूर्ण अॅकॅडमीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. फिनोलेक्स अॅकॅडमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 07/Feb/2025