चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील मठाच्या बाजूस असलेल्या जंगलात कवल तोडणीसाठी गेलेल्या वृद्धाचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.५० वाजता घडली. याबाबत सावर्डे पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शिवाजी धोंड्डु महाडीक (६९, डेरवण, गवळवाडी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
शिवाजी महाडीक हे डेरवण मठाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात झाडावर चढून कवळ तोडणीचे काम सुरू असतानाच पाय घसरुन ते जमिनीवर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला व बरगडीला जबर मार बसून गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानात त्यांचा मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 08/Feb/2025














