नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी राजापुरात आज पोलीस दलाच्या वतीने कार्यशाळा

राजापूर : देशात नव्याने अस्तीत्वात आलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) या कायद्यांबाबत माहिती देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

राजापूर नगर परिषदेच्या एसटीडेपोसमोरिल छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात येथे सकाळी ११ वाजता हे तालुकास्तरीय मार्गदर्शन कर्यशाळा होणार आहे. या शिबीरात विद्यार्थी, व्यापारी, पत्रकार, पोलीस पाटील, नागरिक यांना नवीन कायद्यांतील तरदुती व अन्य विस्तृत माहिती दिली जाणर आहे.

या कार्यशाळेत कायदेतज्ञ, सरकारी अभियोक्ता तसेच राजापूर बार असोशिएशनचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार, एड. मिलींद चव्हाण, एड. सुन्नेना देसाई आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेला सगळयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Happy journey marathi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 08-02-2025