रामपूर : गुहागर-विजापूर महामर्गावर चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टेम्पोला (टाटा छोटा हत्ती) शॉर्टसर्किटने आग लागून मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गुढे येथील टेम्पो मालक मार्गताम्हाने बाजारपेठेत खरेदीसाठी आला होता. त्याने आपला टेम्पो लॉक करुन रस्त्याच्या बाजूला लावून एका हॉटेलमध्ये नाष्टासाठी गेला. याच दरम्यान टेम्पोमधून अचानक धूर आला आणि लगेच गाडीने पेट घेतला. यावेळी एकच धावाधाव सुरु झाली. जमलेल्या नागरिकांनी आग पाण्याने विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीमध्ये टेम्पोची केबीन जळाली असून मोठे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 08/Feb/2025














