रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे आंबा बागेत काम करणाऱ्या मजुराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना बुधवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५५ वा. सुमारास घडली. राम लोकचंद मनोहर (६२, मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. बाणकोट मंडणगड) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. तो खबर देणार आंबा बाग मालक मोहम्मद हनिफ शरिफ खिसे यांच्याकडे कामाला होता. बुधवारी रात्री तो लघुशंकेसाठी झोपडीतून बाहेर आला असता, तिथेच चक्कर येउन पडला. ही बाब बाग मालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी राम मनोहरला हलवून पाहिले असता तो काही हालचाल करत नसल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे उपचारांसाठी दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बाणकोट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 08/Feb/2025














