चिपळूण : चिपळूण शहरात भारतीय जनता पक्षातर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक प्रभागात अभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. अभियानाला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानास चिपळूण शहरात विविध पदाधिकाऱ्यांकडून सुरुवात झाली आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी केली जात आहे.
सदस्य करून घेण्यासाठी भाजपमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षात संपर्कात राहून सदस्य नोंदणी करीत आहेत. शहरातील फळ विक्रेते, रिक्षा व्यावसायिकांपर्यंत सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.
भाजपकडून सुरु करण्यात आलेल्या या सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे अशा भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 08/Feb/2025














