चिपळूण : सावर्डे वहाळ फाटा येथे १२ जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता अपघात घडून महिला जखमी झाली होती. तिच्यावर कराड येथे अनेक दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत सावर्डे पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे शर्मिला रवींद्र भुवड (४१, रा. आगवे, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वहाळ फाटा येथे झालेल्या अपघातात भुवड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 08/Feb/2025














