मंडणगड : दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे १० फेब्रुवारी रोजी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा जिल्ह्यातील दिव्यांगांना लाभघेता येणार आहे.
दापोली, मंडणगड तालुक्यातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला सूचना देऊन या शिबिरात दिव्यांग लाभार्थी जास्तीत-जास्त उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पंचायत समितीला देण्यात आल्या आहेत. जो व्यक्ती दिव्यांग आहे, परंतु त्याच्याजवळ प्रमाणपत्र नाही, अशा लाभार्थ्यांनी शिबिरात उपस्थित राहणे आवश्यक आहे. शिबिराच्या नियोजनाबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 08/Feb/2025














