लांजा : पडवण येथे १९ फेब्रुवारीला रेकॉर्ड डान्स स्पर्धा

लांजा : लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा पडवण क्र. १ येथे आजी-माजी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती पडवण व रांबाडेवाडी-घडशीवाडी पडवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून लांजा तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा लहान गट, मोठा गट व खुला गट अशा तीन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. वैयक्तिक डान्स प्रकार लहान गटामध्ये प्रथम क्रमांक रुपये ३ हजार, द्वितीय क्रमांक रुपये २ हजार, तृतीय क्रमांक रुपये १ हजार व उत्तेजनार्थ (दोन) पाचशे रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह. तसेच वैयक्तीक डान्स प्रकार मोठा गटमध्ये प्रथम क्रमांक रुपये ४ हजार, द्वितीय रुपये ३ हजार, तृतीय रुपये २ हजार व उत्तेजनार्थ (दोन) रुपये पाचशे व सन्मानचिन्ह. खुला गट ग्रुप डान्स मध्ये प्रथम क्रमांक रुपये ५ हजार, द्वितीय क्रमांक ४ हजार, तृतीय क्रमांक ३ हजार, उत्तेजनार्थ (दोन) रुपये पाचशे व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी योगेश प्रिंदावणेकर (९३७०४१२४५८), सुरज कुरतडकर (९९८७४५४५२८), कृष्णा रांबाडे (९८२३९४२२४७), स्वाती भिसे (९०२२४५९५४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 08/Feb/2025