खेड : तालुक्यातील भरणे काळकाई मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार अरुण रामचंद्र पाष्टे (रा. दिवाणखवटी, ता. खेड) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात १ फेब्रुवारीला रात्री १० वाजण्याच्या दरम्यान झाला. याची माहिती पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण आप्पा येवले यांनी दिली.
६ फेब्रुवारीला सायंकाळी ट्रेलरचालक लालचन्द माली (३९, सध्या रा. वडखळ, पेण) व दुचाकीस्वार अरुण रामचंद्र पाष्टे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ट्रेलरचालक लालचंद माली ट्रेलर घेऊन मुंबईकडे जात असताना भरणे काळकाई मंदिराजवळ उभा केला होता. त्यावेळी दुचाकीस्वार अरुण रामचंद्र पाष्टे याने या ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये स्वार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 08/Feb/2025














